KING JAMES BIBLEशोधा

Marathi Indian Revised Version Bible

स्तोत्र 114

सर्व · स्तोत्रशोधा

1जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले,

2तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले.

3समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली.

4पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या.

5हे समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देने तू का मागे हटलीस?

6पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता?

7हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर थरथर काप.

8तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.

Sources and attribution