KING JAMES BIBLEशोधा

Marathi Indian Revised Version Bible

स्तोत्र 120

सर्व · स्तोत्रशोधा

1माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले.

2हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.

3हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?

4तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.

5मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.

6शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.

7मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.

Sources and attribution