Marathi Indian Revised Version Bible
स्तोत्र 13
1हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे?
2पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?
3हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर.
4मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील.
5परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते.
6मी परमेश्वरासाठी गाईन, कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे.