Marathi Indian Revised Version Bible
स्तोत्र 43
1हे देवा, तू माझा न्याय कर, आणि भक्तिहीन राष्ट्राविरूद्ध तू माझी बाजू मांड,
2कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस; तू मला का दूर केले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करत फिरू?
3तू आपला प्रकाश आणि सत्य पाठवून दे, ते मला चालवोत. तुझ्या पवित्र डोंगराकडे आणि मंडपाकडे ते मला मार्गदर्शन करोत.
4तेव्हा मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा मोठा आनंद आहे, त्याकडे जाईल, आणि हे देवा, माझ्या देवा, वीणा वाजवून मी तुझी स्तुती करीन.
5हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस? आतल्या आत तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण जो माझी मदत आणि माझा देव त्याची मी आणखी स्तुती करेन.