KING JAMES BIBLEशोधा

Marathi Indian Revised Version Bible

स्तोत्र 73

सर्व · स्तोत्रशोधा

1खात्रीने देव इस्राएलास चांगला आहे, जे अंतःकरणाने शुद्ध आहेत.

2पण माझ्यासाठी जसे माझे पाय बहुतेक निसटणार होते; माझे पाय बहुतेक माझ्या खालून निसटणार होते.

3कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला.

4कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही, पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात.

5दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात; ते दुसऱ्या मनुष्यासारखे जुलूमात नसतात.

6अभिमानाने ते त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या हाराप्रमाणे आपल्याला सुशोभित करतात; झग्यासारखा ते हिंसाचाराचे वस्र घालतात.

7अंधत्वातून असे पाप बाहेर येते; वाईट विचार त्यांच्या अंतःकरणातून निघतात.

8ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात; ते गर्वाने हिंसाचाराची धमकी देतात.

9ते आकाशाविरूद्ध बोलतात, आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते.

10म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्या वचनातले पाणी भरपूर पितात.

11ते म्हणतात, “देवाला हे कसे माहित होणार? काय चालले आहे ते देवाला कसे कळते?”

12पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत; ते नेहमी चिंतामुक्त असून धनवान झाले आहेत.

13खचित मी आपले हृदय जपले, आणि आपले हात निरागसतेत धुतले हे व्यर्थ आहे.

14कारण दिवसभर मी पीडला जातो आणि प्रत्येक सकाळी शिक्षा होते.

15जर मी म्हणालो असतो की, मी या गोष्टी बोलेन, तर मी या पिढीच्या तुझ्या मुलांचा विश्वासघात केला असता.

16तरी या गोष्टी मी समजण्याचा प्रयत्न केला, पण त्या माझ्यासाठी खूप कठीण होत्या.

17मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो, आणि नंतर त्यांच्या भवितव्याचा शेवट मला समजून आला.

18खचित तू त्यांना निसरड्या जागी ठेवतो; त्यांना तू खाली नाशात पाडतोस.

19कसे अचानक ते उध्वस्त झाले. आणि भयानक दहशतीत ते संपूर्ण नष्ट झाले.

20जागा झालेल्या मनुष्यास जसे स्वप्न निरर्थक वाटते; तसे हे प्रभू, जेव्हा तू जागा होशील, तेव्हा त्यांचे ते स्वप्न तुच्छ मानशील.

21कारण माझे हृदय दुःखीत झाले होते, आणि मी खोलवर घायाळ झालो.

22मी अज्ञानी होतो आणि सूक्ष्मदृष्टीची उणीव होती; मी तुझ्यापुढे मूर्ख प्राण्यासारखा होतो.

23तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे; तू माझा उजवा हात धरला आहे.

24तू आपल्या उपदेशाने मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर तू मला गौरवात स्वीकारशील.

25स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय कोणी प्रिय नाही?

26माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत, पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य आहे.

27जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; जे तुझ्याशी अविश्वासू आहेत त्या सर्वांचा तू नाश करशील.

28पण माझ्याविषयी म्हटले, तर देवाजवळ जाणे यामध्येच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वरास आपले आश्रयस्थान केले आहे. मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करीन.

Sources and attribution